फिट रहायचंय? मग हा आहारही घ्या..


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - तुम्ही नियमित व्यायाम करत असाल, तर शरीराच्या आहाराचीही गरजा असते. व्यायाम करताना खर्च होणाऱ्या कॅलरीज भरून काढण्यासाठी व्यवस्थित आहार घेणेही आवश्यक आहे. तुम्ही नीट आहार घेतला नाही, तर शरीर व्यायाम करताना साथ देणार नाही. तुमचा व्यायाम यशस्वी पूर्ण करण्यासाठी आपण काय खातो, याकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. कर्बोदके आणि प्रथिनयुक्त आहार घेतला, तरच तुम्ही पूर्ण ताकदीने व्यायाम करू शकाल.



व्यायाम आणि आहारामधूनच फिटनेस राखता येतो. त्यामुळे खेळाडूंसाठी कर्बोदकयुक्त आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रथिने कर्बोदकांबरोबर काम करत शरीर अधिक सुदृढ आणि आरोग्यदायी बनवतात. पण अति प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्यास शरीराला त्रासही होऊ शकतो. अति प्रमाणात प्रथिनेे शरीरात गेल्यास थेट किडनीशी निगडित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय आहार आणि व्यायाम करु नये.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post