कोल्हापूरला महापुराचा धोका, पंचगंगेने धोका पातळी ओलांडली

माय अहमदनगर वेब टीम
कोल्हापूर - नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ सुरूच राहिल्याने गुरुवारी रात्री पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने आज सायंकाळी पंचगंगेची ‘मच्छिंद्री’ झाली. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर केर्लीनजीक पाणी आले. रेडे डोहही फुटला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ‘एनडीआरएफ’च्या आणखी दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. रात्री उशिरा शाहूपुरीतील कुंभार गल्‍ली, व्हिनस टॉकीज, पेंढारकर कलादालन परिसरात पाणी शिरले.

गुरुवारी दुपारी पावसाने उघडीप दिली. मात्र, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असल्याने पंचगंगेला महापूर आला आहे. नृसिंहवाडीतही पाणी पातळीत वाढ झाल्याने दक्षिणद्वार सोहळा झाला. नदीकाठावरील नागरिकांना सर्तक राहण्याचे, स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सकाळी सूर्यदर्शनही झाले. यानंतर ऊन-पावसाचा खेळ रंगला. पावसाने उसंत घेतल्याने पाणी पातळी वाढीचा वेग कमी झाला. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातून नद्यांची पाणी पातळी कमी होत गेली, तर 


 
पूर्वेकडे ती वाढत गेली. बुधवारी दिवसभरात झपाट्याने वाढलेल्या पंचगंगेच्या पातळीतही रात्रीपासून संथ वाढ होत गेली. पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगेचे पाणी दर तासाला सरासरी पाऊण ते एक फुटाने वाढले. आज मात्र, पाणी पातळी इंचाने वाढत गेली. सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी 41.2 फुटावर होती. दुपारी तीन वाजता ती 42.11 इंचावर गेली. सांयकाळी चार वाजता पंचगंगेने धोक्याची 43 फूट ही पातळी गाठली. रात्री पंचगंगेचे पाणी शिवाजी पूल-गंगावेश रस्त्यावर पंचगंगा तालीम मंडळापर्यंत आले. रात्री दहा वाजता पंचगंगेची पातळी 44 फुटावर गेली.

रेड डोह फुटला; कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर केर्ली (ता. करवीर) जवळ कासारी नदीचे पाणी रस्त्यावर आले. या पाण्यातूनच वाहतूक सुरू होती. मात्र, सकाळी अकरा वाजता रस्त्यावरील पाणी दोन ते अडीच फुटापर्यंत वाढले. तरीही त्यातून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू होती. जिल्हा प्रशासनाने बॅरेकेटींग लावून या मार्गावरील वाहतूक बंद केली. काही वेळाने आंबेवाडीनजीक असलेला रेडडोहही फुटला. पवार पाणंदही पाण्याखाली गेली. यामुळे वडणगे आणि त्या मार्गे पुढे जाण्यासाठी चिखली फाट्याजवळ असलेल्या रस्त्यावर गर्दी वाढली. या ठिकाणीही गुडगाभर पाणी होते. स्थानिक तरूणांनी साखळी करून या पाण्यातून वाहनांची ये-जा सुरू ठेवली होती. सायंकाळनंतर या मार्गावर पाणी वाढल्याने वाहतूक बंद झाली. रात्री केवळ आंबेवाडीपर्यंतच वाहतूक सुरू होती.

कोल्हापूर-राधानगरी मार्गावर; महामार्गाच्या सेवा रस्त्यावरही पाणी

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर आजही पाणी असल्याने त्यावरील वाहतूक बंदच होती. दरम्यान या मार्गावरील मरळी, कळे आदी ठिकाणचे पाणी ओसरले. कळे-बाजार भोगाव मार्गावर करंजफेण येथे आलेले पाणीही आज सकाळी ओसरल्याने हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर हळदी गावात भोगावती नदीचे पाणी शिरले. रस्त्यावर दीड ते दोन फुट पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. राधानगरीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. कोल्हापूर-गारगोटी मार्गावर कूर-मडिलगे दरम्यान वेदगंगेचे पाणी रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. कसबा बावडा-शिये मार्गावरही पाणी आले आहे. यामुळे त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली फाटा परिसरात सेवा रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे.

राधानगरीचे तीन स्वंयचलित दरवाजे खुले

जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले राधानगरी धरण आज सकाळी आठ वाजता 96 टक्के भरले. सकाळपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होता. यामुळे धरणात येणारे पाणी आणि वीज निर्मितीसाठी सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग काही काळ सारखाच राहिला. यामुळे सुमारे दोन ते तीन तास धरणांची पाणी पातळी स्थिर होती. यानंतर धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत गेली.

सांयकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. यानंतर धरणाचे स्वंयचलित दरवाजे खुले होण्याची प्रतिक्षा सुरू झाली. वार्‍याचा जोर नसल्याने दरवाजे खुले होत नव्हते. मात्र, अवघ्या पाच मिनिटांत धरणाचा तिसर्‍या क्रमांकाचा आणि त्यापाठोपाठ लगेचच सहाव्या क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. या दोन्ही दरवाज्यातून 2856 क्यूसेक्स तर वीज निर्मितीसाठी 1400 क्यूसेक्स असा 4 हजार 256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वारणेतूनही विसर्ग; जंगमहट्टी भरले

वारणा (चांदोली) धरणही आज सकाळी

धरण     क्षमता         आजचा साठा    टक्केवारी

राधानगरी    08.36    8.02    96

तुळशी    03.47    2.39    69

वारणा    34.40    28.11    82

दूधगंगा    25.39    20.11    79

कासारी    02.77    2.42    87

कडवी    2.51    1.90    75

कुंभी    2.71    2.26    83

पाटगाव    3.71    3.01    81

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post