ICC रँकिंग: विराट कोहली अव्वल स्थानी कायम!


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवी रँकिंग जाहीर केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या रँकिंगमध्ये पहिल्या आणि दुस-या क्रमांकावर कायम आहेत. त्याचबरोबर कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पहिल्या स्थानी असून विराट कोहली दुस-या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबूशेन याने तिसरे स्थान पटकावले आहे.

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज लोकेश राहुल पाकिस्तानच्या बाबर आझमनंतर फलंदाजांच्या टी -२० क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच तिसर्‍या क्रमांकावर आहे. एकदिवसीय गोलंदाजांच्या यादीत भारताचा जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी आहे तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड दुसर्‍या स्थानी आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंडचा नील वॅग्नर दुसतिस-या व टीम साऊदी चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या दहा रँकिंगमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह नवव्या क्रमांकावर आहे.

टी २० गोलंदाजांच्या यादीत अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खान पहिल्या क्रमांकावर आहे. संघांच्या रँकिंगमध्ये भारत एकदिवसीय स्वरूपात दुसर्‍या स्थानावर आहे, तर कसोटी व टी -२० स्वरूपात तो तिस-या स्थानी आहे.

इंग्लंडच्या जॅक क्रॉलीची झेप...

साऊथॅम्प्टन येथे पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावलेला इंग्लंडचा जॅक क्रॉली आणि त्याच सामन्यात सात बळी घेणारा जेम्स अँडरसन यांनी कसोटी क्रमवारीत झेप घेतली आहे. क्रॉलीने ९५ व्या स्थानावरून २८ व्या स्थानी झेप घेतली आहे. तर वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर पहिल्या दहा गोलंदाजांच्या यादीतून बाहेर गेलेल्या जेम्स अँडरसनने १४ व्या स्थानावरून आठवे स्थान पटकावले आहे. 

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत स्टोक्सची घसरण 

पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामने न खेळणारा बेन स्टोक्स अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसर्‍या स्थानावर घसरला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर अव्वल स्थानी आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post