माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ७९.७४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८१० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५४९ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २७३, अँटीजेन चाचणीत २४३ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९४ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६७,संगमनेर १९, राहाता ०१, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ३२, कॅंटोन्मेंट ०६, नेवासा ०३, श्रीगोंदा ०१,पारनेर ०४, अकोले ०३, राहुरी १८,कोपरगाव ०३, जामखेड ०२, मिलिटरी हॉस्पीटल ०५ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २४३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०९, राहाता ४६, श्रीरामपुर १७, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा ०७, श्रीगोंदा ३२, पारनेर १४, अकोले २८, राहुरी १६, शेवगाव २४, कोपरगाव २२ आणि कर्जत २३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २९४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १५१, संगमनेर १६, राहाता १४, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ४०, श्रीरामपुर १६, कॅंटोन्मेंट ०४, नेवासा ०६, पारनेर ०६, अकोले ०५, राहुरी १०, शेवगाव ०२, कोपरगांव ०७, जामखेड ११ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ४८४ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १६८, संगमनेर २२, राहाता २५, पाथर्डी १२, नगर ग्रा.६५, श्रीरामपूर ३२, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा ११, श्रीगोंदा १८, पारनेर १७, अकोले १३, राहुरी ०८,
शेवगाव ०७, कोपरगाव २४, जामखेड ३४, कर्जत १६ मिलिटरी हॉस्पीटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: १५०१५*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३५४९*
*मृत्यू: २६७*
*एकूण रूग्ण संख्या:१८८३१*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
Post a Comment