५३९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३६३ नवे रुग्ण वाढले

 

*रुग्ण बरे होण्याची प्रमाण ७८.१७ टक्के*
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०६२० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही  ७८.१७ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता  २७९८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४०, अँटीजेन चाचणीत २१६ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५,  पाथर्डी ०२,  नगर ग्रा. १३, नेवासा ०२, पारनेर ०५ आणि शेवगाव ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २१६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १३, संगमनेर २५, राहाता ३१, पाथर्डी १९, श्रीरामपुर ०२, कॅंटोन्मेंट १६, नेवासा ०९, श्रीगोंदा १५, पारनेर १३, राहुरी ०३, शेवगाव १०,  कोपरगाव ३२, जामखेड २० आणि कर्जत ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८५, संगमनेर ०६, राहाता ०४, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपुर ०१, नेवासा ०१, श्रीगोंदा ०२, पारनेर ०१, अकोले ०१, राहुरी ०१, शेवगाव ०१, आणि कोपरगाव ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ५३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा २७७, संगमनेर ३५, राहाता १७, पाथर्डी ३१, नगर ग्रा.४९, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा ०२, श्रीगोंदा १४, पारनेर १६, अकोले ०३, राहुरी १३, शेवगाव ०२, कोपरगाव १०, जामखेड १७, कर्जत २४, मिलिटरी हॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: १०६२०*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२७९८*

*मृत्यू :१६८*

*एकूण रूग्ण संख्या:१३५८६*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post