‘डाएट’ म्हणून काय खाल ? मग हे नक्की वाचा



 माय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - जंक फूड खाणं आणि आपल्या तब्येतीचं कुपोषण आणि आपल्या शारीरिक क्षमता यांचा परस्पर संबंध आहेच. आपल्याकडे तर अनेक मुलांना सर्रास इटिंग डिसऑर्डर दिसतात. 

त्या का आहेत, आपण काय खातोय हेही त्यांना अनेकदा कळत नाही.

मात्र त्यांना खाण्याचं प्रचंड क्रेव्हिंग असतं. मिठाचे पदार्थ सतत खातात. वेफर्स, चिप्स, सळ्या सतत खाल्ल्या जातात. ते खाऊनही मन भरत नाहीच. मात्र त्याचा परिणाम असा होतो की ते जेवतच नाही. शरीरात प्रोटीनची कमतरता तयार होते.

आपल्याकडे आता तरुणांतही डिप्रेशनचं प्रमाण मोठं आहे. त्यातूनही काहीजण प्रचंड खातात. रेस्टेलेस होतात. त्या केसेसकडे पाहिलं तरी लक्षात येतं की याचं खाण्याचं तंत्र बिघडलं आहे, त्याच्या मुळाशी डिप्रेशन असावं.

त्यात आपली फिगर, वजन, त्वचेचा पोत हा सेलिब्रिटींसारखाच असावा असा आग्रह.

काही जण मुद्दाम कमीच खातात, काही जण ओकून काढतात, तर काही जण आपण बारीक म्हणून प्रचंड खात सुटतात. कसकसल्या पावडरी घेतात. काही जणांना तर भीतीही वाटते, आपल्या दिसण्याची किंवा कुणी आपल्याला दिसण्यावरून चिडवण्याची. त्याचा परिणाम म्हणून एकतर ते खूप खातात नाही तर अजिबातच खात नाहीत.

मुळात म्हणजे हे सगळं गंभीर आहे, प्रचंड काहीतरी घोळ आहे, असंही त्यांना वाटत नाही. 

डाएट करताय? सावधान.

मुळात सतत डाएट करत राहणंही काही हेल्दी नाही. का करतात सतत तरुण मुलं डाएट तर याचं उत्तर एकच, दिसणं. मात्र त्यात ते फिटनेसचा, समतोल आहाराचा काहीच विचार करत नाहीत. सतत फळं खाणं, सतत भाज्या उकडून खाणं, सतत सूप पिणं, म्हणजे काय उत्तम डाएट नाही. हे काही डाएटिंग नाही. त्यानं शरीराचं पोषण काही होत नाही.

उलट रोज वरणभात, भाजीपोळी खाणं हे उत्तम डाएट. त्यानं शरीराचं पोषण होतं, पण डाएटच्या नावाखाली जो अतिरेक केला जातो त्यानं शरीराला फॅट्स मिळत नाहीत. त्यामुळे मेंदूतली रासायनिक प्रक्रियाही बाधित होते. व्हिटॅमिन्स मिळत नाहीत, त्यामुळे एकूण शारीरिक क्षमताही घटतेच. व्हिटॅमिन डी मिळत नाही. त्यामुळे हाडं ठिसूळ होतात. मात्र या सार्‍याकडे काही तरुणांचं लक्ष नाही.

दुसरं म्हणजे लॅक्टिन इनटॉलरन्स.  आपण खातो, तेव्हा झालं समाधान. आता पोट भरलुंळे खाऊनही समाधान मिळत नाही. परिणाम असा की, मुलं खात राहतात. ओव्हर इटिंग, बंज इंटिंग अशा बर्‍याच डिसऑर्डर तरुण मुलांमध्ये जाणवतात. जसं बारीक दिसण्यासाठी स्वतर्‍ला उपाशी ठेवलं जातं, तसाच हा ओव्हर इटिंगचाही अतिरेक अनेकांमध्ये दिसतो.

हे कुपोषणच!


आपण भाज्या खात नाही. पालकाची भाजी आवडत नाही; पण त्यातलं ल्युटीन डोळ्यांसाठी आवश्यक असतं. इन्स्टंट न्यूडल्स बर्गर खाऊन शरीराला काहीही मिळत नाही. उलट त्रास वाढतो. आजकालच्या अनेक लाइफ स्टाइल डिसऑर्डरचं मूळ हे या भाज्या न खाण्यात आणि सतत जंक फूड खाण्यात आहे.

प्रोसेस फूड. प्रिझव्र्हेटिव्हज असलेलं फूड खाऊन तुम्हाला काहीही मिळत नाही. वेळ नाही म्हणून तुम्ही झटके पट जे खातात, त्यातून शरीराला काहीही मिळत नाही. अनेक तरुण मुलांना भाज्या, फळं यांच्या चवीही ओळखता येत नाहीत, कारण ते खातच नाहीत. त्यातून वयात येताना आणि तरुणपणीही हार्मोन्सची गडबड होते आणि आपल्या शरीराला घातक ठरते.

त्यामुळे आपण काय खातोय, याकडे जरा लक्ष द्या!

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post