'हा' अभिनेता लिलावती रुग्णालयात दाखल


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला शनिवारी सायंकाळी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर संजय दत्तला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर नॉन कोविड कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.

संजय दत्तला शनिवारी अचानक श्वसनाचा आणि छातीत त्रास सुरू झाला. त्यामुळे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संजय दत्तला करोना सदृश्य लक्षणं जाणवल्यानं तातडीनं रॅपिड अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून, या चाचणी रिपोर्ट अजून आलेला नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post