राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख पार


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -
राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या 3 लाख 38 हजार 362 वर गेली आहे. शुक्रवारी 12,822 नवे रुग्ण तर, 11,081 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तसेच 275 मृत्यूंची नोंद करण्यात आली. एकूण रुग्णसंख्या 5 लाख 3 हजार 084 तर बळींची संख्या 17,367 वर गेली आहे. राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 48 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 67.26% तर मृत्युदर 3.45% इतका आहे.

राज्यात सध्या 9 लाख 89 हजार 612 व्यक्ती स्वतंत्र विलगीकरण असून 35 हजार 626 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरन मध्ये आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post