कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाही



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शासनाच्या कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षित राहु शकत नाही तर राज्यातील महिलांना सरकार संरक्षण कसे देऊ शकेल. पनवेल येथील कोविड सेंटरमध्ये घडलेली घटना लांच्छनास्पद असुन या घटनेमुळे करोना परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.

सध्या राज्यभर करोना आजाराच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेल्या आहे. अशा परिस्थतीमध्ये कोविड सेंटर मध्ये घडलेला प्रकार निंदनीय असुन महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोविडचे लक्षणे असले तरी उपचारासाठी जावे की नाही? अशी धास्ती महिलांमध्ये निर्माण झाली आहे. या गोष्टीचा सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. करोना बाधित महिला उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल होते.

त्याठिकाणी तिला उपचार करून लवकर बरे होणे अपेक्षित असतांना आयुष्यात अशा विपरीत प्रसंगाला तिला सामोरे जावे लागते. ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची बाब आहे. कोविड सेंटरमध्ये महिला उपचारासाठी दाखल झाली, त्यावेळी त्याठिकाणी कर्तव्यावर असलेले डॉक्टर्स, नर्सेस आदि उपस्थित नव्हते का? जर उपस्थित असेल तर मग घटना घडलीच कशी? या प्रश्नांमुळे प्रशासनाची व्यवस्थेवर पकड नसल्याचे सिध्द होत असून सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसते.

करोना सारख्या आजाराने राज्यभर थौमान घातले असतांना प्रत्येकाच्या मनात भितीचे वातावरण आहे. सर्वजण स्वत:च्या सुरक्षेच्या काळजीत आहे. दुदैवाने करोनाबाधित झाले तर जिथे सुरक्षित असू त्याच ठिकाणी अशा घटना घडत असेल तर याला जबाबदार कोण? त्यामुळे त्या कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाची चौकशी व्हावी, तसेच या घटनेचा शासनाने गांभीर्याने विचार करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही सौ. कोल्हे यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post