मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबई पोलिसांचे १४ कोटी लागते देणेमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे 14.82 कोटी रुपये अजूनपर्यंत दिलेले नाहीत असे माहिती अधिकाराच्या खाली मागवलेल्या माहितीत उघड झाली आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला तब्बल 30 वेळा याची अधिकृत आठवण करुन दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या संदर्भात माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती. या माहितीत ही देणी 2013 आणि 2019 दरम्यान मुंबई पोलिसांनी सामन्यांदरम्यान पुरवलेल्या सुरक्षा शुल्काची देणी आहेत. याचबरोबर महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंतच्या शुल्काची ऑर्डर काढलेली नाही.

याचबरोबर माहिती अधिकारात मुंबई पोलिसांना फक्त आयपीएल 2018 साठी सुरक्षा पुरवल्याचे 1.40 कोटी रुपये मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सात वर्षांत पहिल्यांदाच मुंबई पोलिसांना सुरक्षा पुरवल्याचे शुल्क मिळाले आहे. याच्या व्यतिरिक्त मुंबई क्रिकेट असोसिएशन एकूण 14 कोटी 82 लक्ष 74 हजार 177 रुपये मुंबई पोलिसांचे देणे लागते. मुंबई पोलिसांनी 2013 ते 2019 मध्ये अनेक एकदिवसीय आणि कसोटी सामने, 2013 चा महिला वर्ल्डकप, 2016 चा टी - 20 वर्ल्डकप आणि 2017 च्या आयपीएलला सुरक्षा पुरवली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post