दूतावास बंद करून ७२ तासांत चालते व्हा!


माय अहमदनगर वेब टीम
ह्युस्टन - येथील चिनी दूतावासात मंगळवारी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जाळण्यात आली. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने त्यावर चीनविरुद्ध आणखी एक कडक कारवाई केली असून, शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत (स्थानिक वेळ) दूतावासाला टाळे ठोकून चालते व्हा, असा आदेश दूतावासातील अधिकार्‍यांना देण्यात आला आहे. चीननेही अमेरिकेला जशास तसे उत्तर देत वुहानमधील दूतावास बंद करा, असे सांगितले आहे.

दरम्यान, चिनी अधिकार्‍यांनी ह्युस्टन दूतावासातील कुठल्या प्रकारची कागदपत्रे दूतावासात जाळण्यात आली, ते नेमकेपणाने अद्याप स्पष्ट झालेले नाही. दूतावासाच्या जवळपास राहणार्‍या लोकांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली होती.

अमेरिका आणि चीन संबंध आता टोकाच्या शत्रुत्वाच्या वळणावर आलेले आहेत. मंगळवारी रात्री ह्युस्टन चिनी दूतावासात हजारो कागदपत्रे जाळली गेली आहेत. घटनेनंतर काही क्षणातच अमेरिकेने गंभीरपणे दखल घेतली आणि 72 तासांत तुमचे चंबुगबाळे येथून आवरा, असे स्पष्टपणे चीनला कळविले आहे.  चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी दैनिकानेही या घटनेची माहिती दिली आहे. ‘ग्लोबल टाईम्स’च्या संपादकांनी अमेरिकेच्या निर्णयाला शुद्ध वेडेपणा म्हटले आहे.

मंगळवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता ह्युस्टनच्या चिनी दूतावासातील मागच्या भागात आगीचे लोळ उठताना दिसले. धूरही निघत होता. जवळपासच्या लोकांनी याबद्दलची माहिती पोलिसांना व अग्निशमन दलाला दिली. दोन्ही दलांचे चमू काही क्षणातच घटनास्थळी पोहोचले; पण दोहोंपैकी कुणालाही आतमध्ये जाऊ देण्यात आले नाही आणि काही वेळाने आग विझली.

व्हिडीओत काय दिसले?

दूतावासासमोरील रहिवाशाने घटनेचा व्हिडीओ बनविला आहे.  फायबरच्या कॅरेटस्मधून काही दस्तऐवज आणले जात आहेत आणि नंतर ते आगीत टाकले जात आहेत, असे त्यात स्पष्टपणे चित्रीत झालेले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post