आ.संग्राम जगताप यांचे कार्य कौतुकास्पद - मंत्री जयंत पाटीलमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - करोना व्हायरसचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. हे संकट मोठे आहे म्हणून या संकटात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपूर्ण राज्यात मोठे मदत कार्य उभारले आहे. नगर मध्येही आमदार जगताप द्वयीनी सुरु केलेले मदत कार्य कौतुकास्पद आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या गुणे आयुर्वेद रुग्णालयात कोविड उपचार सेंटर सुरु करून रुग्णांना दिलासा दिला आहे. जोवर ही महामारी जात नाही तोवर सर्वसामान्यांना आधार व मदत कार्य राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चालूच ठेवावे, सरकार सर्वोतोपरी सहकार्य करत आहे, असे प्रतिपादन मंत्री जयंत पाटील यांनी केले.

मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी रात्री आमदार अरुण जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार राहुल जगताप, शहराध्यक्ष माणिक विधाते, डॉ. फाटके, बाळासाहेब जगताप, सुमतीलाल कोठारी, अतुल भंडारी, नाना पांडोळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आ. संग्राम जगताप यांनी नगर शहरात राष्ट्रावादी काँग्रेसच्या माध्यमातून चालू असलेल्या मदत कार्याची सविस्तर माहिती मंत्री जयंत पाटील यांना दिली. ऐंशीव्या वर्षी जेष्ठ नेते शरद पवार दिवस रात्र राज्यभर दौरे करून आढावा घेत आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही काम करत आहोत, असे सांगून राज्य सरकारकडून अजून मदतीची गरज असल्याची मागणी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post