बिटाच्या रसाचे हे आहेत मोठे फायदे ; जाणून घ्यामाय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - बीटचा रस (ज्यूस) पिण्याने मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून, वृद्धांचा मेंदू तरुणांप्रमाणे कार्यक्षम राहण्यास मदत होत असल्याचा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या वेक फॉरेस्ट विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले. यामध्ये ५५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या २२ पुरुष आणि महिलांचा समावेश करण्यात आला होता. सहभागी झालेल्यांना आठवडय़ातून तीन वेळा असे सहा महिने बीटचा रस पिण्यास दिला. रस पिण्यापूर्वी त्यांना ५० मिनिटे चालण्यास सांगितले होते.

सहभागी झालेल्या निम्म्या लोकांना बीटमधून ५६० मिली ग्रॅम नायट्रेट मिळाले, तर इतरांना बीटमधून अतिशय कमी प्रमाणात नायट्रेट उपलब्ध झाले. ज्या वेळी तुम्ही व्यायाम करता, त्या वेळी तुमच्या मेंदूमधून सोमॅटोमोटर कॉर्टेक्स स्नायूतील माहिती प्रक्रिया सुरू करतो. व्यायाम करण्यामुळे सोमॅटोमोटर कॉर्टेस मजबूत होण्यास मदत होते.

व्यायाम करण्यामुळे आपल्या मेंदूतील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्या वेळी बीटचा रस घेतल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यामुळे सोमॅटोमोटर कॉर्टेस बळकट करण्यासाठी योग्य वातावरण मिळते. याचा थेट परिणाम मेंदूवर होत असून, तो अधिक कार्यक्षम होण्यासाठी मदत होत असल्याचे अभ्यासात दिसून आल्याचे संशोधकांनी सांगितले.

व्यायाम आणि बीट यामुळे मेंदूवर सकारात्मक परिणाम होत असून, त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होत असल्याचे या अभ्यासात दिसून आले.

रोज सकाळी 1 कप बीटचा रस प्यायल्याने त्याचा खूप मोठा फायदा होता. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. रोज 30 ग्रॅम बीट खाल्याने याचा मोठा फायदा होतो. यामुळे लीवरची सूज देखील कमी होते.

बीट कॅल्शिअमची पूर्तता करतो. कॅल्शिअम शरिरासाठी महत्त्वाचं तत्व आहे. कॅल्शिअममुळे हाडे आणि दात मजबूत होतात. बीट शरिरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करतो. मुलांनी आणि युवकांनी बीट चाऊन खालं पाहिजे. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात.

बीटमुळे कफ होण्याची समस्या दूर होते. बीट श्वसननलिका श्वच्छ ठेवते. बीटच्या रसमध्ये मध टाकून लावल्याने शरिरावर खाज येते त्या ठिकाणी लावल्याने ही समस्या दूर होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post