अनलॉक ३ ची नियमावली जारी ; हे सुरू आणि 'ते' बंद



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसला, तरी देशव्यापी  लॉकडाऊनचे नियम आणखी थोडे शिथिल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने अनलॉक ३ ची नियमावली बुधवारी जाहीर केली.नव्या नियमावलीत ५ आगस्ट पासून  योग इन्स्टिट्यूट आणि व्यायामशाळांना परवानगी देण्यात आली आहे.कोरोना महारोगराई चा  फैलाव होऊ नये यासाठी अनेक गोष्टींवर कडक निर्बंध लावले होते. अनलॉक ३ मध्ये काही सवलती देण्यात आल्या असल्या, तरीही नियंत्रण क्षेत्रात मात्र ३१ ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन असेल, असेही केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना मुळे मार्च पासून लावण्यात आलेली रात्र संचारबंदी हटवण्यात आली आहे.

राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशासोबत सखोल चर्चा केल्यानंतर ३१ आगस्ट पर्यंत शाळा, महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. नियंत्रण क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा तसेच योगा इन्स्टिटयूट ला लॉकडाऊन मधून वगळण्यात आले असले तरी त्यांना नियमांचे पालन करावे लागेल. या संबंधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच  मानक कार्य प्रणाली (एसओपी) जाहीर करण्यात येणार आहे.

१५ आगस्ट ला देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या  स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रमात भौतिक दूरत्व, मास्क घाण्याचा नियमांचे कडेकोट पालन करावे लागेल. या संबंधी आरोग्य मंत्रालयाच्या एसओपी जाहीर करण्यात येईल, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

नियंत्रण क्षेत्र तसेच  इतर भागात असलेले सिनेमागृह, जलतरण तलाव, बार, ऑडिटोरियम, मेट्रो,  मनोरंजन पार्क सोडून उर्वरित गतिविधी सुरू करता येईल असे ही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post