राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र' ; सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन्


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - राफेलच्या उड्डाणावरूनच त्याच्या मारक क्षमतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. 2,130 किलोमीटर प्रति तास, एवढा प्रचंड वेग, या लढाऊ विमानांना इतर लढाऊ विमानांपेक्षा वेगळं ठरवतो. सर्वात महत्वाचं म्हणजे रडारपासून बचाव करण्याची क्षमता आणि लांबूनच शत्रूवर नजर ठेऊन त्याला नेस्तनाबूत करण्याची क्षमता राफेलला लाभली आहे. आतापर्यंत भारत रशियाकडून मिळालेल्या सुखोई विमानांच्या सहाय्याने चीनला काऊंटर करत होता. मात्र आता भारताच्या ताफ्यात अन् भात्यात राफेल सारखे ब्रम्हास्त्र आले आहे.

अशी आहे भारताच्या राफेल अन् चीनच्या J-20ची ताकद - अनेक तज्ज्ञ मंडळी भारताचे राफेल चीनच्या J-20 सारखे असल्याचे मानत आहेत. जगाला जेवढी माहिती राफेलसंदर्भात आहे. तेवढी माहिती स्टिल्थ कॅटेगिरीच्या चिनी लढाऊ विमानासंदर्भात नाही.

राफेलची खासीयत इतर विमानांच्या तुलनेत अद्भूत - सैन्य विषयातील तज्ज्ञ मारूफ रजा यांनी म्हटल्याप्रमाणे, राफेलच्या उड्डाणाचा वेग त्याला जगात सर्वात वेगळे ठरवतो. एवढेच नाही, तर आपल्या सारख्या विमानांच्या तुलनेत राफेल अव्वल आहे.

70 लाख रुपयांच्या हॅमर क्षेपणास्त्राने सज्ज, क्षणात शत्रू उद्धवस्त - राफेल हॅमर मिसाइलने सुसज्ज आहे. ही भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यामुळे भारताची शक्ती वाढते. भारताचे हे क्षेपणास्त्र कुठल्याही प्रकारचे बंकर अगदी क्षणात उद्ध्वस्त करू शकते. भारतासाठी हे कुठल्याही स्थितीत अत्यंत महत्वाचे आहे. विशेष म्हणजे अत्यंत दुर्गम असलेल्या पूर्व लडाख सारख्या भागाचाही याच्या मारक क्षमतेवर काहीही परिणाम होत नाही.

या क्षेपणास्त्राची मारक क्षमता प्रचंड आहे. हे क्षेपणास्त्र 20 किलोमीटर ते 70 किलो मीटर अंतरावरील लक्षदेखील अगदी अचूकपणे भेदू शकते. ज्या विमानाने हॅमर क्षेपणास्त्र फायर केले जाते, ते विमान, या मिसाईच्या दूरवर अचूक मारा करण्याच्या क्षमतेमुळेच शत्रूच्या एअर डिफेन्सपासून सुरक्षित राहण्यास यशस्वी ठरते. कारण, लांबूनच मारा करता येत असल्याने विमान शत्रूच्या रडारवर दिसू शकत नाही.

HAMMER क्षेपणास्त्राच्या किटमध्ये वेगवेगळ्या आकाराचे बॉम्बदेखील लावले जाऊ शकतात. ते 125 किलो, 250 किलो, 500 किलो एवढेच नाही, तर 1000 किलो ग्रॅमचेही असू शकतात.

अचूक शस्त्रांनी सज्ज राफेल - राफेलमध्ये अनेक अचूक शस्त्र तैनात केली जाऊ शकतात. 300 किलो मीटरपर्यंत अचूक मारा करणारे स्कल्प क्रूझ क्षेपणास्त्र राफेलला सर्वाधिक घातक बनवतात. Meteor एअर-टू-एअर मिसाइलचा निशाना कधी चुकत नाही. MICA एअर-टू-एअर क्षेपणास्त्र राफेलला शत्रूपेक्षा वरचढ ठरवते, तर हॅमर क्षेपणास्त्र या विमानाला अजेय ठरवते.

राफेल 4.5 च्या पिढीतील आहे - राफेल लढाऊ विमान 4.5 च्या पिढीतील आहे. हे विमान रडारला चुकवून जाण्यात तरबेज मानले जाते. भारताच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे आहे. आतापर्यंत भारतीय हवाई दलात असलेले मिराज-2000 अथवा सुखोई लढाऊ विमानं ही तिसऱ्या अथवा चौथ्या पिढीतील आहेत.

एअरक्राफ्ट कॅरिअरवरूनही उड्डान करण्याची क्षमता - राफेल लढाऊ विमान एअरक्राफ्ट कॅरियरवरूनही उड्डान करू शकते. हे विमान टेहळणी पासून ते शत्रूच्या हद्दीत घूसून हल्ला करण्यास सक्षम आहे. भारताने 2016 मध्ये फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांसाठी 60 हजार कोटी रुपयांचा सौदा केला होता. यात 30 फायटर जेट आहेत, तर 6 ट्रेनर विमानं आहेत.

राफेलसाठी विशेष तयारी - हवाई दलाने राफेलची मोठी व्यवस्था केली आहे. हवाई दलाने तब्बल 400 कोटी रुपये खर्च करून राफेलसाठी शेल्टर, हँगर आणि मेन्टनंस फॅसिलिटी तयार केली आहे.

राफेलची ताकद असणारा भारत चौथा देश - राफेल शक्ती मिळवणारा भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे. भारत आणि फ्रान्स शिवाय केवळ इजिप्त आणि कतारकडेच ही विमानं आहेत. पंतप्रधान मोदींनी अनेक वेळा या विमानांचे कौतुक केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post