कुलरचा शॉक लागून तीन सख्या बहिणींचा मृत्यूमाय अहमदनगर वेब टीम
यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील कोदुली श्रीरामपूर येथील गजानन भुरेवार यांच्या तीन मुलींचा कुलरचा शॉक लागून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी साडेआठ च्या दरम्यान घडली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरातील सर्वात मोठी मुलगी रिया ही कुलरमध्ये ठेवलेले अन्न घेण्यासाठी गेली असता कुलरला हात लागल्यानंतर ती त्या कुलरला चीटकली होती. तिथे असणारी लहान बहीणी संचिता व मोना या धावत गेल्या असता त्यांनाही शॉक लागला काही वेळानंतर या तिघी बहिणी शॉक लागून मृत्यू  पावल्या. घर उघडल्यानंतर तिघींचे मृतदेह कुलरच्या आसपास दिसून आले. घटनेची माहिती राळेगावचे तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे व गटविकास अधिकारी रविकांत पवार आणि पोलिस निरीक्षक दिलीप पोटभरे यांना मिळतात त्यांनी तातडीने घटनास्थळ पोहचले. घटनेची माहिती गावामध्ये पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post