बीझी असता ? मग, उत्तम आरोग्यासाठी हे कराचमाय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - धावपळीच्या दिनक्रमामध्ये स्वतःसाठी वेळ देणं फार कठिण असतं. यामुळे आरोग्याचे खुप मोठे नुकसान होत असते. काहींचं असं म्हणणं असतं की, बीझी असल्यानंतरही त्यांना आरोग्याच्या कोणत्याच समस्यांचा सामना करावा लागला नाही. परंतु, आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असाच समज असतो आणि हाच त्यांचा सर्वात मोठा गैरसमज असतो. अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्षं करणं अत्यंत महागात पडू शकतं. यासाठी काही महत्वाचे उपाय केले तर आपले आरोग्य उत्तम राहु शकते.
दिवसभरामध्ये जेव्हाही लक्षात येइल तेव्हा दीर्घ श्वास घेण्यास विसरू नका. डीप ब्रीदिंगमुळे आपल्या सेल्समध्ये जास्त ऑक्सिजन पोहोचतो आणि आपलं डोकं शांत राहण्यासही मदत होत. ५ मिनिटांची डीप ब्रीदिंग आपल्याला रिलॅक्स करून कमीतकमी दोन तासांसाठी फ्रेश करते. दररोज कमीत कमी १० ते १२ ग्लास पाणी पिण आवश्यक असतं. जेवताना पाणी पिणं टाळा. जेवणाआधी जवळपास अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यामुळे आपण जेवण कमी प्रमाणात करतो. जेवणानंतर अध्र्या तासाने पाणी प्या. याआधी जर तहान लागलीच तर घोटभर पाणी प्या. त्यापेक्षा जास्त पाणी पिणं टाळा.

दररोज ७ तास झोपणं अत्यंत आवश्यक असतं. झोपण्याची उत्तम वेळ म्हणजे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत. यावेळेदरम्यान झोपणं शक्य होत नसेल तर प्रयत्न करा की, निदान एका ठराविक वेळेतच झोप पूर्ण कराल. यामुळे शरीर आणि मन कन्फ्यूज होत नाही आणि झोपही चांगली येते. दररोज ६० मिनिटांचा वेळ आपल्यासाठी काढा. ४५ मिनिटं ब्रिस्क वॉक, सायकलिंग, स्टड्ढेचिंग, वेट लिफ्टिंग इत्यादी एक्सरसाइज करा. १५ मिनिटं डीप ब्रिदिंग आणि मेडिटेशन करा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post