महापालिकेत घुसला कोरोना ; ऑफिस मधील कर्मचाऱ्यांला लागण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील एका विभागातील कर्मचार्याला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, संपूर्ण इमारतीचे औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले आहे. तसेच विनाकारण महापालिकेत येणार्या नागरिकांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.
नगर शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, शहरात तोफखाना, सिद्धार्थनगर, नालेगाव, आडतेबाजार, कवडेनगर, पद्मानगर हे परिसर कन्टेन्मेंट झोन करण्यात आलेले आहेत. महापालिकेकडून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत एका विभागात काम करणार्या कर्मचार्यालाच कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी संपूर्ण प्रशासकीय इमारत औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कार्यालयीन कर्मचार्यांव्यतिरिक्त इतरांना दोन दिवस कार्यालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. महापालिका कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणावर होत असलेली गर्दी पाहता ही गर्दी टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
Post a Comment