तो’ कोरोना बाधित हिवरे बाजारचा नव्हे तर भाळवणीचा;


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मधील गुरुवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात कोरोना बाधित आढळलेला ‘तो’ व्यक्ती आदर्श गाव हिवरे बाजारचा रहिवाशी नव्हे तर जावई असून तो भाळवणी (ता.पारनेर) येथील रहिवासी आहे. सदर व्यक्ती मुंबईहून सासरवाडीकडील नातेवाईकांबरोबर आलेला होता. त्यास केवळ हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या पत्रावर तपासणी साठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे गावातील कोणीही घाबरून जावू नये असे आवाहन हिवरेबाजार ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हिडीओ द्वारे केले आहे.

हिवरे बाजार गावातील एक व्यक्ती तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात गेलेला आहे. परंतु त्याचा कुठलाही अहवाल अदयाप आलेला नाही, जो बाधित व्यक्तीचा अहवाल आला आहे. सदर व्यक्ती भाळवणी (ता.पारनेर) येथील रहिवासी आहे. हिवरे बाजार येथील रहिवाशी असलेले आणि मुंबई पोलिस दलात मध्ये कार्यरत असताना मृत्यू झालेल्या व्यक्तींचा तो जावई आहे. हा व्यक्ती हिवरे बाजार मधील त्याच्या नातेवाईकांबरोबर मुंबईहून आलेला होता. तो गावात येण्याअगोदरच त्याची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली होती. व त्यास कोरोना चाचणी साठी केवळ हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या पत्रावर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यामुळे हिवरे बाजार ग्रामस्थांनी घाबरून न जाता आत्तापर्यंत जशी खबरदारी घेतली तशीच यापुढेही घ्यावी असे आवाहन पोपटराव पवार यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हिडीओ द्वारे केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post