यांची महापालिकेने घेतली गंभीर दखल


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरातील बुरुडगल्ली, हातमपुरा, पारशाखुंट, हलवाई गल्ली, डावरे गल्ली, नालबंद खुंट परिसरातील नळांद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे केल्यानंतर या परिसरातील जलवाहिनीचे दोष शोधण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने सुरू केले आहे. शहराच्या विविध भागात नळावाटे गटारीचे पाणी येत असल्याबाबत विविध भागातील नागरिक तक्रारी करत आहेत. काही नागरिकांनी लेखी तक्रारी थेट महापालिकेत दिल्या तर काहींनी व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून पुराव्यासह अधिकार्‍यांपर्यंत तक्रारी पोहचविल्या आहेत. अधिकार्‍यांपर्यंत तक्रारी पोहचविल्या आहेत.

शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी यांच्यासह बुरुडगल्ली, काळामारुती चौक येथील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना तक्रार पाठविली आहे. तसेच सदरची गंभीर बाब महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्याही निदर्शनास आणून दिली होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची तातडीने दखल घेऊन नळवाहिनीची तातडीने दुरुस्ती करुन द्यावी व स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी पुरवठा करावा.

तसेच सदर विभागातील सर्व हौद पाणीटाक्यांमध्ये तातडीने जंतूनाशक औषधे टाकण्याची कार्यवाही करावी. तातडीने जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम न झाल्यास परिसरातील नागरिक आंदोलन सुरू करतील व त्याची सर्व जबाबदारी महापालिका व पाणी पुरवठा विभागावर राहील, असा इशारा देण्यात आला होता. याबाबत दैनिक नवा मराठाने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत बुधवारी (दि. 8) सायंकाळीच पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रोहिदास सातपुते यांच्यासह पथकाने या परिसरात भेट देऊन पाहणी केली. तसेच जलवाहिन्यांमधील दोष शोधण्याचे आदेश कर्मचार्‍यांना दिले. त्यानुसार हे काम सुरू करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post