सीएट टायरकडून एस 95 मास्क लाँच


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - सीएट टायरची मालकी असलेल्या आरपीजी गृप कंपनीने वैयक्तिक संरक्षण उत्पादनांच्या व्यवसायात प्रवेश केला आहे. कंपनीने गोसेफ या बॅँडच्या नावाने प्रदुषणविरोधी एस 95 मास्क लाँच केले आहेत. हे मास्क 30 वेळा धुवून वापरणे शक्य आहे.


एस95 मास्क हा सहा पडद्यांचा (लेअर) आहे. विशेष म्हणजे त्याचा धुवून वापर करणे शक्य आहे. याची बाजारात 249 रुपये किंमत आहे. हे मास्क सीईएटीच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच विविध ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे. देश सुरक्षित ठेवण्याकरता गोसेफ एस 95 मास्क बाजारात आणल्याचे सीएट टायर कंपनीने म्हटले आहे. कंपनी पीपीईमध्ये विविध उत्पादने बाजारात आणणार आहे.


सीएट टायर्सचे मुख्य विपणन अधिकारी अमित तोलानी म्हणाले, की देश कोरोनाच्या संकटाबरोबर लढत आहे. मास्कसारखी उत्पादने देशात कमी आहेत. अशावेळी आम्ही पीपीईच्या व्यवसायात प्रवेश केला आहे.


असामान्य परिस्थितीत सुरक्षितता, स्वच्छता आणि संरक्षण ही खरी चिंता आहे. गोसेफ एन 95 मास्क हे सहा पडद्यांचे आहेत. सर्वात आतील पडदा हा जीवाणु प्रतिविरोधक आहे. मास्कला खास क्लिप देण्यात आली आहे. त्यामध्ये थुंकीतील तुषार रोखण्यासाठी व श्वास व्यवस्थित घेण्यासाठी क्लिपचा उपयोग करता येतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post