आता कर्करोगावर माती प्रभावी


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - संशोधकांनी मातीतील जीवाणूची एक नवी प्रजाती शोधली आहे. हे जीवाणू जैविक संयुगांचे विघटन करू शकतात. अगदी कर्करोगाला कारणीभूत होणार्‍या रसायनांचेही ते विघटन करण्यास सक्षम असतात. अशी रसायने कोळसा, वायू, तेल आदींच्या ज्वलनातून निर्माण होतात. पर्यावरणाचे प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठीही हे जिवाणू उपयुक्त ठरू शकतील असे संशोधकांना वाटते.

अमेरिकेतील कॉर्नेल युनिव्हर्सिटीतल डॅन बकले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की या नव्या जीवाणूला पॅराबुर्कोल्डेरिया मॅडसेनियाना असे नाव देण्यात आले आहे. हे अशा कुळातील जीवाणू आहेत जे अतिशय जटील संयुगांचेही विघटन करण्यास सक्षम असतात. इतकेच नव्हे तर हवेतील नायट्रोजनला मातीत साठवून ठेवण्यासाठी ते वनस्पतींच्या मुळांनाही मदत करतात. ही एक अनोखी प्रजाती असल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. भविष्यात पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच कर्करोगासारखे आजार रोखण्यासाठीही त्यांचा उपयोग होऊ शकतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post