कराेनासंदर्भात राहुल गांधींनी दिला हा सल्ला
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - कोराेनाची समस्या गंभीर झाली आहे. परंतु आपण ती गंभीर नसल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत आहाेत. परंतु समस्याला सामाेरे जाण्यासाठी ती स्वीकारली पाहिजे, असा सल्ला कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला.
डाॅक्टर डे निमित्त देशातील काही डाॅक्टरांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. कराेनाच्या अवघड काळात डाॅक्टरांकडून दिल्या जात असलेल्या सेवेचे गाैरव करुन डाॅक्टरांना सलाम केला.
राहुल गांधी म्हणाले, ‘जगात सर्वत्र भारतीय डाॅक्टर भेटतातच. जगभरातील लाेक म्हणतात, भारतीय डाॅक्टरांशिवाय रुग्णालय चालू शकत नाही. भारतीय डाॅक्टर देशाचे प्रतिनिधी बनून कराेनाच्या गंभीर काळात जगभरात सेवा देत आहे. हे संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.
Post a Comment