आमदार पडळकर यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक


माय अहमदनगर वेब टीम
रावेर - आ.गोपीचंद पडळकर यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतांना, रावेरात धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करून त्यांना पाठींबा दिला आहे.

यावेळी भाजपा कार्यालयासमोर भाजपा तालुकाअध्यक्ष राजन लासुकर व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करून मनोगते व्यक्त केले.

याबाबत तहसीलदार यांना निवेदन देवून आ.गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा असून आघाडी सरकारने लवकर धनगर समाजाला एसटी आरक्षण जाहीर करावे. मागील सरकारने एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. त्याची लवकर अंबलबजावणी करावी, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी लखन सावळे, संदीप सावळे, निलेश सावळे, मनोज धनगर, योगेश धनके, शुभम नामायते, कैलास पाचपोळे, निलेश बोरसे व कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार यांच्या वतीने शिवकुमार लोलपे यांनी निवेदन स्वीकारले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post