वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांना अटकपूर्व जामीन जमीन मंजूर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अल्पवयीन मुलाच्या छळ प्रकरणात गुन्हा दाखल असलेले महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना जिल्हा न्यायालयाने अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
डॉ. बोरगे यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर जिल्हा न्यायाधीश पी. व्ही. चतुर यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. डॉ. बोरगे यांच्या वतीने अॅड. शिवाजी सांगळे यांनी काम पाहिले. करोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. करोना काळात महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. बोरगे यांच्यावर जबाबदारी आहे. ते शहर सोडून जाणार नाहीत.
तपास कामात पोलिसांना सहकार्य करतील, असा युक्तिवाद अॅड. सांगळे यांनी न्यायालयासमोर केला. अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन त्याला मारहाण करत छळ केल्याप्रकरणी 28 जून रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, लिपिक बाळू घाटविसावे व मुलाची आई यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Post a Comment