भंडारदरातील पाणीसाठा 4000 दक्षलक्ष घनफुटावर




माय अहमदनगर वेब टीम
भंडारदरा - उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात पाऊस टिकून असल्याने धरणांत नव्याने पाणी दाखल होत आहे. 11039 क्षमतेच्या भंडारदरात काल सायंकाळी संपलेल्या 36 तासांत 381 दलघफू पाणी आले. त्यामुळे पाणीसाठा 3918 दलघफू झाला होता. सुरू असलेला पाऊस आणि आवक यामुळे पाणीसाठा रात्री 4000 दलघफूच्या पुढे सरकला होता.

निळवंडे धरणातही पाण्याची आवक होत असल्याने या धरणातीलही पाणीसाठा निम्म्याच्या पुढे गेला आहे. काल सकाळी साठा 4164 दलघफू झाला होता. वाकी धरणातून 356 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पाणलोटात पाऊस सुरू असल्याने परिसर हिरवागार झाला आहे. धबधबेही सक्रीय असल्याने सौंदर्य आणखी बहरले आहे.

पण करोनाच्या पार्श्वभूमीवर हे सौंदर्य न्याहळण्यासाठी पर्यटक नाहीत. मुळा पाणलोटात काल पावसाची उघडीप झाली आहे. तरीही पाण्याची आवक सुरू असल्याने मुळा धरणातील पाणीसाठा 8300 दलघफू झाला होता. भंडारदरा पाणलोटातील पाऊस मिमीमध्ये भंडारदरा 45, घाटघर 67, रतनवाडी 57, पांजरे 52, वाकी 40.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post