आरोपींना तात्काळ अटक व्हावी, देवेंद्र फडणवीसांची मागणी




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृह'वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञातांनी तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यानंतर सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याप्रकरणी निषेध नोंदवला आहे. हे अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटले की, 'भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे'. मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे' अशी माहितीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

या हल्ल्यात घराच्या काचांवर देखील दगडफेक करण्यात आली असून कुंड्यांचेही मोठे झाले आहे. पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांनी घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी दिले आहेत. आरोपींची तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागमी सर्व स्तरातून होत आहे. पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांनी घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी दिले आहेत. आरोपींची तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

राजगृहाचे ऐतिहासिक महत्त्व

मुंबईतील दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post