पोलिसाने जागला माणुसकीचा धर्म



माय अहमदनगर वेब टीम
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील बेवारस मनोरूग्ण लॉकडाऊनपासून उपाशीपोटी राहुन हताश झाले होते. अन्नाच्या शोधात फिरणार्‍या मनोरुग्णाच्या पोटाला आधार देण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिक्षक कार्यालयातील पो. हे. कॉ. राजेंद्र गोडगे यांच्यासह त्यांच्या मित्रांनी मनोरुग्णांसाठी अन्नाचे पाकिटे तयार करुन शहरातील विविध भागातील मनोरुग्णाचा शोध घेवून त्यांना दोन वेळचे अन्नाचे पाकिटे पुरवून पोलिसातील माणुसकी धर्म कृतीतून दाखवून दिला.

शहरातील विविध भागात मनोरुग्ण अढळून येतात. लॉकडाऊनपासून हे मनोरुग्ण उपाशी असल्याचे जाणवत होते. अन्नाच्या शोधात मनोरुग्ण रस्त्यावर दिसू लागले. लॉकडाऊनपूर्वी हॉटेल, खानावळ, वडापाव सेंटर आदी ठिकाणाहून या मनोरुग्णांना पोटापुरते अन्न मिळत होते. परंतु लॉकडाऊन चालू झाल्यानंतर मात्र मनोरुग्णांना अन्न मिळेना. अन्नाच्या शोधात मनोरुग्ण हिंडताना दिसू लागले.

याकडे पो. हे. कॉ. राजेंद्र गोडगे यांचे लक्ष गेले. मनात सहज कल्पना आली आणि मनोरुग्णासाठी अन्नाच्या पाकिटांची व्यवस्था करण्याचे ठरविले. या गोष्टीची कल्पना गोडगे यांनी संजय पवार, संदिप पवार, रमेश चंदन यांना दिली. त्यांनी या कल्पनेला मुर्त स्वरुप देण्याचे ठरविले. या सर्वांनी स्वतःच्या खिशातून निधी जमविला. दोन वेळच्या अन्नाच्या पाकिटांची व्यवस्था केली. मनोरुग्णाचा शोध घेवून त्यांना अन्नाची पाकिटे देण्याची धडपड सुरु केली. पोलीस खात्यातील आपले काम सांभाळून मनोरुग्णांची दोन वेळच्या अन्नाच्या पाकिटे पोहच करण्याची सेवा नियमित सुरु ठेवली.

पोलीस खात्यातील कामामुळे वेळ मिळाला नाही तर श्री. गोडगे यांचे मित्र संदिप पवार, रमेश चंदन, संजय पवार यांनी मनोरुग्णांना अन्नाची पाकिटे पोहच केली. कधी अन्न छत्रालयातून तर कधी बाहेरगावच्या मजुरांसाठी बनविलेल्या भोजन व्यवस्थेतून, कधी मित्रांच्या घरुन अन्नाच्या पाकिटांची व्यवस्था करण्याची नित्याची धडपड सुरु झाली. दोन वेळचे अन्न पुरवून पोलिसातील माणुसकी धर्म कृतीतून दाखवून दिला.

लॉकडाऊन काळात अतिरीक्त पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या समवेत शहरात गस्त घालत असताना अनेक ठिकाणी मनोरुग्ण खिन्न अवस्थेत पडलेले दिसले. यातील एक मनोरुग्ण इशारेद्वारे जेवण मागत असताना माझ्यातील माणुसकी जागी झाली. काही झाले तरी मनोरुग्णाच्या एक वेळची जेवणाची व्यवस्था करण्याचे ठरवले. मित्रांना ही कल्पना बोलून दाखविली. मित्रांनी क्षणाचा विलंब न लावता त्यास होकार देवून पहिल्या दिवशी तर एका हॉटेल चालकाचे घर गाठले 50 ते 60 वडेपाव करुन देण्याची विनंती केली त्यानुसार वडेपाव वाटप करुन मनोरुग्णांच्या पोटाला आधार देण्याचे माणुसकीच्या धर्मातून केले.
- राजेंद्र गोडगे, पो.हे.काँ.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post