...म्हणून साई दर्शनासाठी येणार्‍या नागरीकांना प्रवास पास देवू नये



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शिर्डी येथील श्री. साईबाबा मंदिरात यावर्षी दि.5 जुलै रोजी होणारा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार नाही, त्यामुळे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणार्‍या नागरीकांना प्रवास पास देवू नये, असे पत्र नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षकांना पाठविले आहे.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देशभरातुन साई पालख्या शिर्डीत दाखल होत असतात. साईबाबा संस्थानकडुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद असल्याचे जाहीर केले असुन साईपालखी करीता पास वितरीत केल्यामुळे सदर ठिकाणी वादाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीमध्ये दि.5 जुलै रोजीचा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नसल्याने साई मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने शिर्डी येथील साईदर्शनासाठी प्रवास पास न देणेबाबत आपले अधिनस्त अधिकारी व संबंधित यंत्रणा यांना आपले स्तरावरुन योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, असे नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या पत्रात म्हंटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post