महापालिकेच्यावतीने कम्युनिटी किचन पुन्हा सुरु


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील कन्टेन्मेंट एरियातील हातावर पोट असलेले गरीब वर्ग, मोलमजुरी करणारा वर्ग इत्यादींची उपासमार होऊ नये यासाठी नगर महापालिकेने पुढाकार घेउन पुनश्च सामाजिक संस्था, प्रतिष्ठीत नागरिक, देणगीदार, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्याने कम्युनिटी किचन, संजोग हॉटेल यांचे सहकार्याने दि.1 जुलैपासून चालु केले आहे.

नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने दररोज शहराचा नवीन भाग हा कन्टेन्मेंट एरिया (हॉटस्पॉट) मनपाला घोषित करावा लागत आहे. त्यामुळे कन्टेन्मेंट एरिया पूर्णपणे बंद करावा लागत असल्याने त्या भागातील रहिवासी यांना कामावर जाता येत नाही. दुकानदार, व्यावसायिकाना दुकाने उघडता येत नाहीत. त्यामुळे हे कम्युनिटी किचन पुन्हा सुरु केले असून सदर कम्युनिटी किचनमार्फत नगर शहरातील कन्टेन्मेंट एरिया सिध्दार्थनगर, नालेगांव, तोफखाना येथील भागातील गोरगरीबांना दररोज दुपारी जवळ जवळ 1000 नागरिकांना पोळी-भाजीचे (फुड पॅकेटस) त्यांचे एरियात घरोघर जाउन मनपा कर्मचार्‍यांचे मार्फत वाटप करण्यात येत आहे.

तरी गोरगरीब वर्गातील लोकांनी या कम्युनिटी किचनचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post