दप्तराचे ओझे होणार कमी
माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पाठ्यपुस्तकाचे ओझे कमी करण्यासाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्याची पुस्तके बालभारती भांडारगृहात आली आहेत.
नाशिक विभागासाठी १ लाख ६९ हजार ९२५ पुस्तके मिळाली असून, उर्वरित २९ हजार पुस्तके लवकरच मिळणार आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी (दि.30) एकात्मिक पुस्तकांच्या प्रारंभ झाला असून मालेगाव व निफाड तालुक्यात हे काम रखडले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते सातवीसाठी एकात्मिक प्रकल्पांतर्गत खास पुस्तके तयार करण्यात आली आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक इयत्तेसाठी विविध विषयांच्या वर्षभरातील अभ्यासक्रमाचा सत्रानुसार तीन पुस्तकांत समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार २१ पुस्तके तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचा हलका होणारा हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे.
दरम्यान, नाशिक विभागातील १ केंद्रांवर १ लाख ९८ हजार ९२५ पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. या केंद्रामध्ये नाशिक मनपा, धुळे मनपा, मालेगाव मनपा, जळगाव मनपा, निफाड, मालेगाव, शिंदखेडा, चोपडा, नवापूर आदींचा समावेश आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणारे दप्तराचे ओझे कमी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. परंतु, अनेक शाळांमधील दप्तराचे ओझ कमी झाले नाही. त्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना व द्विभाषिक पाठ्यपुस्तके योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे एकत्रित सर्व पुस्तके शाळेत नेण्याची गरज नाही. त्यासाठी सर्व पुस्तकांचे मिळून एकच पुस्तक असणार आहे. मराठी विद्यार्थ्यांसाठीच ही योजना असून त्यासाठी पाठ्यपुस्तके बालभारती भांडारगृहांमध्ये आली आहेत.
अशी आहे योजना
पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके एकत्रीकरण करून त्याचे तीन भागात पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीसाठी बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित यासह खेळू, करू, शिकू ही चार पुस्तके एकाच पुस्तकात केली आहेत. इयत्ता तिसरीसाठी बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, परिसर अभ्यास ही पुस्तके एकत्र आहेत.
चौथीसाठी बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, परिसर अभ्यास, तर पाचवीसाठी बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, परिसर अभ्यास, हिंदी सुलभभारती ही सर्व पुस्तके एकात्मिक पुस्तकात असतील. सहावी, सातवीमध्ये बालभारती, माय इंग्लिश बुक, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान, हिंदी सुलभारती विषय एकात्मिक पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.
Post a Comment