खासदार डॉ.विखेंच्या प्रयत्नाला यश


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - केंद्र सरकारने पुरस्‍कृत केलेल्‍या राष्‍ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील आठ तालुक्‍यातील शेतक-यांना कांदा चाळ उभारणीसाठी ४ कोटी ४१ लाख आणि वैयक्तिक शेततळे अस्‍तरीकरणासाठी ३ कोटी ४१ लाख रुपयांचे प्रलंबित अनुदान खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे मंजुर झाले आहे.

       यासंदर्भात माहीती देताना खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून राबविण्‍यात येत असलेल्‍या राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेच्‍या माध्‍यमातून कांदा उत्‍पादक शेतक-यांना कांदा चाळ उभारणीसाठी अनुदान दिले जाते. कृषि विभागाच्‍या माध्‍यमातून याबाबत प्रस्‍ताव सादर केले जातात. या अनुदानासाठी शेतकरी वंचित राहीले होते. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील आठ तालुक्‍यांमधुन सादर झालेल्‍या प्रस्‍तावांचा केंद्र सरकारकडे आणि कृषि विभागाकडे  पाठपुरावा केल्‍यामुळे आजअखेर ५०७ शेतक-यांना ४ कोटी ४१ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले असल्‍याचे खासदार डॉ.विखे पाटील म्‍हणाले.

       राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेच्‍या माध्‍यमातून सन २०१९-२० अंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्‍तरीकरण योजनेसाठीही केंद्र सरकारने अनुदान मंजुर केले असून यासाठी कृषि विभागाच्‍या माध्‍यमातून आत्‍तापर्यंत दाखल झालेल्‍या  प्रस्‍तावांपैकी ४८४ शेतक-यांच्‍या प्रस्‍तावाला मंजुरी मिळाली असून, अनुदानापासुन वंचित राहीलेल्‍या या शेतक-यांना एकुण ३ कोटी ४१ लाख १० हजार ३५१ रुपयांचे अनुदान मिळणार असल्‍याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

       या दोन्‍हीही योजनांबाबत कृषि विभागाकडे शेतक-यांनी प्रस्‍ताव दाखल केलेल्‍या प्रस्‍तावालाही मंजुरी मिळावी यासाठी आपला पाठपुरावा सुरु असून उर्वरित शेतक-यांनाही लवकरच या योजनेतून प्रलंबित अनुदान मिळेल असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post