अखेर या तारखांना लागणार सीबीएसई दहावी, बारावीचा निकाल


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) दहावी आणि बारावीचा निकालाच्या तारख्या जाहीर झाल्या आहेत. कराेना व्हायरसमुळे हा निकाल लांबत चालला होता. त्यामुळे निकालाकडे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर १८ जुलै राेजी बारावीच्या वर्गाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दहावी इयत्तेचा निकाल १५ ते १७ जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार आहे. सीबीएसई दोन्ही वर्गाची माहिती वेबसाइट वर अपलोड केली आहे. दहावी, बरावीच्या राहिलेल्या विषयांची परीक्षा यापूर्वीच रद्द करण्याची घोषणा बोर्डाने नुकतीच केली आहे. त्यानंतर लगेच निकाल लावण्यासाठी सीबीएसई बोर्डाने तयारी केली होती. त्यानुसार आता निकालाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post