नगरला मेडिकल कॉलेजसाठी पाठपुरावा करणारमाय अहमदनगर वेब टिम
अहमदनगर - जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना आरोग्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणार्‍या आणि स्वताबरोबरच इतरांचे आरोग्याला धोका पोचविणार्‍यावर कडक कार्यवाही करा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोरोना हा बरा होणारा आजार आहे, मात्र, त्यासाठी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करुन घ्या, असे आवाहन त्यांनी केले. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असा विश्वास त्यांनी जिल्हावासियांना दिला.

दरम्यान, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केल्याने येथे होणार्‍या इतर आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचार अन्यत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन अहमदनगर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post