या विद्यापीठाच्या परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर



माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - दिंडोरी रोडवरील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या(एमयूएचएस) उन्हाळी सत्रातील आरोग्य विद्याशाखा अभ्यासक्रमाच्या परीक्षेस ४ ऑगस्ट २०२० पासून प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणूण परीक्षेचे वेळापत्रक ४५ दिवस अगोदर जाहीर करावे, असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले होते.

या अनुषंगाने विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२० मधील परीक्षा टप्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वर जाहीर केले आहे. उन्हाळी सत्रातील पदवीपूर्व अंतीम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक दि.०५ जून रोजी जाहिर करण्यात आले होते. या वेळापत्रकात एक दिवसाचा खंड देण्यात आलेला नव्हता. त्या अनुषंगाने पदवीपूर्व अंतीम वर्षाच्या वेळापत्रकामध्ये एक दिवसाचा खंड देऊन दि. १६ जुलै २०२० ऐवजी दि. ०३ ऑगस्ट २०२० पासून नियोजित करण्यात आले आहे अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.

बी.एस्सी इन पॅरामेडिकल टेक्नोलॉजी, डिप्लोमा इन पॅरामेडिकल टेक्नोलॉजी, मास्टर इन पब्लीक हेल्थ न्युट्रीशन, एम.बी.ए. (हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), एम.एस्सी. (फार्मा. मेडिसिन), पी.जी. डी.एम.एल.टी., बॅचलर इन ऑप्टोमेट्री, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री, डिप्लोमा इन ऑप्थालमिक, सर्टीफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा दि. १८ ऑगस्ट २०२० पासून नियोजित करण्यात आल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post