‘कोरोना’ चाचण्यांसाठी २२०० रुपये दर निश्चित



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. राज्य शासनाने हा दर निश्चित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खासगी प्रयोगशाळांनी कोरोना चाचण्यांसाठी या दरानेच आकारणी करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. सर्वसामान्य रुग्णांकडून अवाजवी आकारणी केली जाऊ नये, सर्वसामान्य रुग्णांचे हित जपले जावे, यादृष्टीकोनातून हे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने  नुकतीच यासंदर्भात चार सदस्यांची समिती गठीत केली होती. या समितीने शासनाला अहवाला सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांनी या दरनिश्चितीनुसार दर आकारावेत, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post