115 किलो चंदनासह एकास अटकमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – चंदनाच्या लाकडांची चोरी करून वाहतुक करणार्‍या चोरट्यास नेवासा पोलिसांनी सापळा रचुन शिताफीने अटक केली. ही कारवाई नेवासा एमआयडीसी परिसरात मंगळवारी (दि.7) केली. याबाबतची अधिक माहिती अशी की, नेवासा पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून नेवासा पोलिसांनी नेवासा एमआयडीसी परिसरात सापळा रचला. तेव्हा एक इसम सुगंधी चंदनाची लाकडे पांढर्‍या रंगाच्या सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये भरताना आढळुन आला.

पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय-36, रा. घोडेगाव, ता. नेवासा) असे असल्याचे समजले. पोलिसांनी विचारलेल्या अधिक माहितीस त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्याकडील 115 किलो चंदन (किंमत 2 लाख 53 हजार), व स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम एच 16 बी एच 3789) (किंमत 5 लाख) असा 7 लाख 53 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलिस हवालदार दत्तात्रय गावडे, संजय चव्हाण, पोलिस नाईक किरण गायकवाड, शिवाजी माने, पो. कॉ. विठ्ठल थोरात, मोरे आणि वाघमोडे यांनी केली. आरोपी अण्णा गायकवाड यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 10 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post