स्वयंसेवी संघटनेची घर घर वॉर रुम, हर घर गनिमी कावाची मोहिम
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोनाच्या संक्रमणावर मात करुन, चायनाला धडा शिकवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्यावतीने घर घर वॉर रुम, हर घर गनिमी कावाची घोषणा करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांना आरोग्याचा कानमंत्र देऊन, चायना मालावर बहिष्कार घालण्यासह चायनामध्ये लोकशाही आणण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

कोरोना महामारीत नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी व चायनाच्या कुरापतखोरीवर लगाम लावण्याकरिता या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक सैनिकाची भूमिका बजावणार आहे. कोरोनावर मात मि ळवण्यासाठी सध्या रोग प्रतिकारशक्ती वाढविणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. सकाळ, संध्याकाळ योग प्राणायाम केल्याने मनुष्याची प्रतिकार शक्ती वाढणार आहे. तर सकाळ व संध्याकाळ आयुर्वेद, युनानी पध्दतीचा काडा प्यायचा आहे. कोरोनावर विजय मिळवण्यासाठी प्राणायाम व ऊर्जायाम ही दोन अस्त्रे अवलंबण्याचे या मोहिमेद्वारे आवाहन केले जाणार आहे.

चीनमध्ये लोकशाही अस्तित्वात आल्यास त्यांची कुरापतखोरी थांबण्यास मदत होणार आहे. रविवार दि.12 जुलै रोजी हुतात्मा स्मारकात 12 वाजता ही मोहिम कार्यान्वित केली जाणार आहे. फेसबुक लाईव्ह करुन योग, प्राणायामसह आयुर्वेद व युनानी काडा बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जे राव निमसे, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, जालिंदर बोरुडे आदि प्रयत्नशील आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post