नोटिशील इंदुरीकर महाराजांचे उत्तर


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -  महिलांचा अपमान केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली. यावर इंदोरीकर महाराज यांनी आपण असे बोललोच नसल्याचा दावा केला आहे. इंदुरीकर यांनी कीर्तनातून अंधश्रद्धा पसरवणारे वादग्रस्त वकतव्य केले होते. ते महिलांविषयी नेहमीच आक्षेपार्ह वक्तव्ये करत असतात. महिलांना जाहिररीत्या अपमानीत करत असतात, असा आरोप तृप्ती यांनी केला होता.
अॅड. मिलिंद  पवार यांच्यामार्फत 26 फेब्रुवारी रोजी इंदुरीकरांना कायदेशीर नोटीस बजावली. अॅड. पवार यांनी पाठविलेल्या कायदेशीर नोटिशीला इंदुरीकर यांनीही यांनीही त्यांच्या वकिलामार्फत कायदेशीर उत्तर दिले आहे. आपले कोणी समर्थक नाही. तृप्ती यांना त्रास देणाऱ्या कुठल्याही समर्थकांना इंदुरीकर महाराज ओळखत नाही. काही अज्ञात लोकांनी काही उद्योग केले असतील, तर त्याला महाराज जबाबदार नाही. इंदुरीकर यांनी आजपर्यंत कधीच कीर्तनातून महिलांना अपमानीत होईल किंवा महिलांचा अनादर होईल असे वकव्य केलेले नाही. तसेच अंधश्रद्धा पसरेल असेही वक्तव्य केलेले नाही, असे त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post