महाविकास आघाडी मान्य नसेल तर भाजपात यामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - 'महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल. ज्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचं सरकार मान्य नसेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षात  यावे. त्यांना सत्ता, पद आणि सन्मान देखील मिळेल,' अशी प्रतिक्रिया भाजपा खासदार सुजय विखे-पाटील यांनी दिली आहे.
पारनेरमधील ५ नगरसेवकांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काहीसं वितुष्ट आलं आहे. त्यातच सुजय विखे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याने आता उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. ही ऑफर त्या पाच नगरसेवकांसाठी तर नाही ना? अशीही जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना राज्यातील महाविकास आघाडी मान्य नसेल तर त्यांनी भाजपात यावे,' असं वक्तव्य खासदार सुजय विखेपाटील यांनी केले आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post