गटई कामगारांना स्टॉल द्या



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेले कष्टकरी गटई कामगारांना रस्त्यावर बसून काम करण्यासाठी स्टॉल त्वरीत वितरीत करण्याची तर केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांना देण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्यावतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे यांना देण्यात आले. वाबळे यांनी गटई कामगारांना लवकरच स्टॉल वाटप केले जाणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, युवा जिल्हाध्यक्ष निलेश आंबेडकर, युवा शहर गटई अध्यक्ष संतोष कांबळे, बलराज गायकवाड, अर्जुन कांबळे, संतोष कदम, गणेश लव्हाळे उपस्थित होते. कोरोनाचे संकट व सुरु झालेल्या पावसामुळे कष्टकरी गटई कामगार यांना उघड्यावर बसून काम करावे लागत आहे.

गटई कामगार रस्त्याच्या कडेला बसून गटई काम करताना पावसामुळे व कोरोनाच्या संसर्ग वाढल्यामुळे आरोग्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. गटई स्टॉल लवकर वितरण करण्यात आले तर त्यांना निश्चितपणे संरक्षण व आधार मिळणार आहे. तरी अहमदनगर जिल्ह्यात लवकर गटई स्टॉल वितरण करण्यात यावे, तसेच या बिकट परिस्थितीमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांना देण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्यावतीने समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post