देशात सहाव्या दिवशी 20 हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधितमाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- भारतात गेल्या 24 तासात 22 हजार 572 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 482 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 7 लाख 4 हजार इतकी झाली आहे. तर आतापर्यंतची एकूण मृतसंख्या 20 हजार 642 इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतात सध्या कोरोनाचे 2 लाख 6 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.भारतात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात हे प्रमाण 14.27 असून जगभरातील सरासरी प्रमाण 68.29 इतके आहे. देशभरात एकूण 20 हजार 160 मृत्यू झाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post