पेन्शनर्स असोसिएशनतर्फे सीएम फंडला मदतीचा हात


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे कोविडच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी 5 लाख 11 हजार 111 रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सभापती काशिनाथ दाते, मिरा शेटे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष सो. सा. गायकवाड, कार्याध्यक्ष रंगनाथ सांगळे, सरचिटणीस शशिकांत इथापे, अरुण दळवी, गोपीचंद इंगळे, बन्सी उबाळे आदी उपस्थित होते.
जि.प.अध्यक्षा घुले म्हणाल्या, सं" जग एका मोठ्या संकटातून जात आहे.  या काळात गरजूंना  मदतीचा हात देणे खूप महत्वाचे आहे.  संकटकाळात न डगमगता त्याला सामोरे जावे लागते. अशीच शिकवण शिक्षक वर्गही देतो." पेन्शनर असोसिएशनच्या शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतरही ही मदत करून समाजाला कृतीयुक्त आदर्श दिला आहे. अशा सामूहिक प्रयत्नातून आपण करोनाविरुद्धच्या लढाईत निश्चित यशस्वी होऊ.
सो. सा.गायकवाड म्हणाले, "नगर जिल्ह्यात सुमारे साडेनऊ हजार पेन्शनर सभासद आहेत. आज कोरोनाच्या संकटकाळात शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post