प्रशासनाची तयारी नुसती कागदावर नको





माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - शहरासह नाशिक जिल्हा क्रिटिकल स्टेज मध्ये असून प्रशासनाची तयारी नुसती कागदावर नको तसेच सर्व हॉट स्पॉट वर तातडीने तपासणी केली पाहिजेतर परिस्थिती नियंत्रणात येईल असे सूचक विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक शहर कोरोना प्रादुर्भावाची स्थिती व उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.

आज सकाळच्य सुमारास फडणवीस हे नाशकात आले. त्यांनी सुरवातीला जिल्हा रुग्णालयाला भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी बिटको रुग्णालयातील कोविड सेंटर येथे पाहणी केली. नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्याच्या करोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले कि नाशिकची परिस्थिती नाजूक होत चालली असून वेळीच याला अटकाव करण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले कि तसेच टेस्टिंगचा वेग वाढवणे आवश्यक असून हे रिपोर्ट २४ तासांत येणे आवशयक आहे. त्यामुळे त्यामुळे मृत्युदर वाढत असून वेळीच रिपोर्ट आले तर रुग्णावर उपचार करण्यास वेळ मिळतो असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार भारती पवार आदी भाजप पदाधिकारी उपस्थित आहेत.

फडणवीस दौरा, ठळक मुद्दे

- शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली

- ICMR नं अग्रेसिव्ह टेस्टिंगची गाईडलाईन दिली आहे

- टेस्टिंगचा वेग वाढविण्याची आवश्यकता

- रुग्णांना बेड आणी टेस्ट रिपोर्ट वेळेवर मिळत नाही

- हे रिपोर्ट 24 तासात येणं आवश्यक

- रिपोर्ट वेळेवर येत नसल्यानं, उपचार सुरू होत नाही

- खाजगी हॉस्पिटलमध्ये अवाजवी बिलांचा मोठा फटका बसतोय

- याचा गैरफायदा खाजगी हॉस्पिटल घेताय

- सरकारने नुसतं ऑडिट करून उपयोग नाही

- सरकारने GR मध्ये त्वरित सुधारणा केली तर खाजगी हॉस्पिटल्सला चाप बसेल

- कोविड केअर सेंटर नुसते उभारून चालणार नाही,त्याठिकाणी ऑक्सिजन सह इतर व्यवस्था हव्यात

- मास टेस्टिंग सुरू करणे आवश्यक

- राज्य सरकारने, महापालिकांना मदत केली पाहिजे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post