आधार कार्ड नियमांमध्ये मोठे बदल; अपडेट करण्यापूर्वी हे जरुर वाचा


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - आधार कार्ड धारकांपुढे येणाऱ्या याच अडचणी पाहता, UIDAI ने जन्म तारीख, नावातील बदल यासाठी काही नव्या अटी जारी केल्या आहेत. तर, मोबाईल क्रमांक आणि इतर माहितीसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसणार आहे. तुम्हालाही आधार कार्डमध्ये ही माहिती अपडेट करायचे असेेल तर काही नवीन अटी घातल्या आहेत.

UIDAIकडून आधार कार्डवर जन्म तारीख अपडेट करण्यासाठी नवी अट घालून देण्यात आली आहे. जन्म तारीख पदलण्याच्या परिस्थितीमध्ये तीन वर्षांहून कमी अंतर असेल तर तुम्ही संबंधित कागदपत्रासह जवळच्या कोणत्याही आधार सुविधा केंद्रावर जाऊन हे बदल करुन घेऊ शकता. तीन वर्षांहून जास्तीचं अंतर कागदपत्रांसह क्षेत्रीय आधार केंद्रात जाणं अपेक्षित आहे.

जन्म तारखेच्या बदलासाठी जन्माचा दाखला, पॅन कार्ड, पासपोर्ट, लेटर हेटवर ग्रुप-ए गैजेटेड अधिकाऱ्याकडून मिळालेली प्रमाणित तारीख, ओळखपत्र, केंद्र शासनाच्या आरोग्य सेवेतील फोटो कार्ड किंवा माजी सैनिक असल्यास त्यासंबंधीचं ओळखपत्र , इयत्ता दहावी किंवा १२ वीचं प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा आवश्यक.

दैनंदिन जीवनात अनेक महत्त्वाच्या व्यवहारांसाठी आधार कार्ड गरजेचे असते. अगदी बँक खात्यापासून ते पासपोर्टपर्यंत सर्वत्रच या आधारची गरज भासते. पण, अनेकदा आधार कार्ड तयार करतेवेळी नकळत झालेल्या काही चुकांमुळं त्यांच्यावर छापून आलेलं नाव, जन्मतारिख किंवा आणखी कोणा एका माहितीच्या तपशीलामध्ये उणीवा आढळून येतात. याच लहान चुका अनेकदा मोठ्या अडचणी उभ्या करतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post