सदोष बियाणेप्रकरणी कंपनी व विक्रेत्या विरोधात कारवाई करामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने खरीपाच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र सोयाबीन आणि बाजरीच्या बियाणे उगवणीसंदर्भातील तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. संबधित शेतकर्‍यांना बियाणे बदलून द्या तसेच संबंधित कंपनी आणि विक्रेत्यांवर तक्रारी दाखल करा, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यासाठी आता २ हजार ६६० मेट्रीक टन युरिया प्राप्त होणार आहे. त्याचे वितरण व्यवस्थित होईल, हे पाहण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागाला दिले. त्यासाठी संबंधित दुकांनावर कृषी विभागाचे कर्मचारी नेमा तसेच आवश्यक असेल तेथे पोलिसांची मदत घ्या. कोणत्याही परिस्थितीत खते व बियाणे यांचा काळाबाजार होणार नाही, तसेच लिंकेज होणार नाही, हे पाहा, असे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी बॅंक आणि सहकार विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या. राज्य सरकारपुढे आर्थिक अडचणी असतानाही महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे उपलब्ध करुन दिले. जिल्ह्यासाठी ९४ कोटी रुपये प्राप्त झाले.
जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी तसेच केशरी कार्डधारकांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियतनाप्रमाणे धान्य वाटप करण्यात आले आहे. राज्य शासनाने केशरी कार्डधारकांनाही ऑगस्टपर्यंत सवलतीत अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, शिवभोजन थाळीचा दर पुढील तीन महिन्यांसाठी पाच रुपये ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post