नागरिकांच्या मदतीशिवाय कोरोनाविरोधातील युद्ध जिंकता येणार नाही'
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी म्हणाले की, राज्यात कोव्हिड-19 विरोधातील मोहिमेत सर्वशहरांमधील नागरिकांनी सोबत येऊन 'कोरोना सतर्कता समिती' स्थापन करावी आणि स्थानिक प्रशासनाला मदत करावी.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे जिल्ह्यातील विविध पालिका आयुक्तांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, जिल्ह्यात कोव्हिड-19 शी सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधां पुरवम्यात आल्या, तरीदेखील स्थानिक प्रशासन मोठे काम करू शकले नाही.
'नागरिकांच्या मदतीशिवाय कोरोनाविरोधातील युद्ध जिंकता येणार नाही'
यादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, 'नागरिकांच्या मदतीशिवाय कोरोनाविरोधातील युद्ध जिंकता येणार नाही. स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला तेव्हाच चालना मिळाली, जेव्हा यात अनेक लोक सामील झाले. काही दिवसांपासून लोक स्वतः चीनी वस्तुंचा बहिष्कार करुन लढ्याला बळ देत आहेत."
'स्थानीक नागरिकांच्या समितीला या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील'
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "शहरांमध्ये कोरोना सतर्कता समिती स्थापन करावी. या मोहिमेत सामन्य नागरीक, समाज सेवी संघटना, तरुणांनी सामील व्हावे. जेष्ठ नागरिकांचे आजार, त्यांचा ऑक्सीजन स्तर, साफ-सफाई, सोशल डिस्टंन्सिंग इत्यादींवर लक्ष ठेवावी."
'स्थानीक प्रशासनाने आपेक्षेप्रमाणे काम केले नाही'
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'कोव्हिड-19 शी सामना करण्यासाठी ठाण्यात मोठे आरोग्य केंद्र बनवण्याचे निर्देश देण्यात आले, पण स्थानिक प्रशासनाने आपेक्षेप्रमाणा काम केले नाही. सरकारने मार्चपासून मोठ्या कोव्हिड केअर सेंटरच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले. मुंबईप्रमाणेच इतर ठिकाणी काम करण्याची गरज आहे.'
Post a Comment