रुग्णांची आर्थिक लूट होता कामा नयेमाय अहमदनगर वेब टीम
नाशिक - करोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासकीय, महापालिका रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्येही करोनावर उपचार सुरू आहेत. परंतु बर्‍याच खासगी रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांची भरमसाठ आर्थिक लूट करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे मनपा आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कडक कार्यवाही करावी, अशा सूचना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत दिल्या. बैठकीस विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त रघुनाथ गावडे, दिलीप स्वामी हे उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते फडणवीस काल नाशिक दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यात त्यांनी जिल्हा रुग्णालयासह मनपा रुग्णालयाची पाहणी केली. येथील मनपाच्या बिटको रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये कोविड सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी 400 बेड ठेवले आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह येथील डॉक्टर्स, नर्स यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी फडणवीस यांनी नाशिककरांना चांगले आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, आ. प्रवीण दरेकर, खा. भारती पवार, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, बाजीराव भागवत, प्रा. शरद मोरे, मिराबाई हांडगे, संगीता गायकवाड, पंडित आवारे, सुनील आडके, हेमंत गायकवाड, शांताराम घंटे, सचिन हांडगे, नवनाथ ढगे, बापू सापुते, सय्यद युनूस, उदय थोरात, योगेश भोर, वपोनि सूरज बिजली, बांधकाम अभियंता नीलेश साळी आदी उपस्थित होते.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या दौर्‍यात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे सुरक्षित अंतर पाळण्याच्या नियमाला सपशेल हरताळ फासला गेल्याचे चित्र दिसून आले. वास्तविक सदरचा पाहणी दौरा ज्या कारणासाठी आयोजित करण्यात आला होता तो दूरच राहिला असल्याचे जाणकारांच्या नजरेतून सुटले नाही.

मनसेनेचे निवेदन

बिटको हॉस्पिटलच्या समस्या तसेच शहरातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मनसेनेचे नाशिकरोड विभागीय अध्यक्ष विक्रम कदम, शहर प्रवक्ते किशोर जाचक, शहर संघटक नितीन पंडित, मनविसे सरचिटणीस प्रशांत बारगळ, शहराध्यक्ष शाम गोहाड आदींनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post