दूध दरासंदर्भात मंत्रालयात आज बैठक !
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -  दूध उत्पादकांना किमान दहा रुपये अनुदान द्यावे, दुधाला भाव द्यावा, यासह विवीध मागण्यांसाठी डाव्या संघटनासह, शिवसंग्राम, भाजप आणि महायुतीचे घटकपक्ष राज्यभर केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला दरम्यान, दूध दरासंदर्भात मंत्रालयात आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्री, शेतकरी संघटनेचे काही प्रतिनिधी तसंच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, राज्यात दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष काल रस्त्यावर उतरले होते. दुधाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. करोना काळात दुधाचा खाजगी खप कमी झाला आहे, त्यातच सहकारी दुग्ध संघ दुधाची कमी खरेदी करत आहेत.

मंत्र्यांच्या डेअरीचे दूध प्राधान्याने खरेदी केले जात आहे, त्यामुळे शेतकर्‍यांकडचे दूध विक्रीविना राहत असून शेतकर्‍यांना नुकसान होत आहे, असे भाजपने म्हटले आहे. गायीच्या दुधाला 10 रुपये तर भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावे, तर 30 रुपये लिटर दराने शेतकर्‍यांकडून दुधाची खरेदी व्हावी यासाठी भाजपने निवेदन दिले. शासनाने ऐकले नाही तर 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post