जपान चीनमधील 57 कंपन्यांना मायदेशी बोलावणार




माय अहमदनगर वेब टीम
टोकियो  - जपान सरकारने चीनमधील china 57 कंपन्यांना 57 companies मायदेशी परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

जगावरील करोना महामारीसाठी जबाबदार असलेल्या आणि आशिया खंडातील भारत, रशिया, जपान, म्यानमार, थायलँड, दक्षिण कोरिया, व्हियतनाम, फिलिपाईन्स, तैवान आदी देशांचा भूभाग बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या चीन विरोधात संपूर्ण जग एकवटले आहे.

अमेरिका, भारत, तैवान आदी देशांनी चीनशी असलेले व्यावसायिक संबंध तोडल्यानंतर आता जपानने चीनचे कंबरडे मोडण्याचे ठरविले आहे. चीनमधील 57 कंपन्यांना मायदेशी परत आणण्याचा निर्णय जपान सरकारने घेतला आहे. त्यामुळे चीनची अर्थसत्ता कोलमडणार आहे.

विशेष म्हणजे या 57 कंपन्यांना परत जपानमध्ये आणल्यानंतर त्या कंपन्यांना जे आर्थिक नुकसान होणार आहे, ते नुकसानही जपान सरकार भरून देणार आहे. चीनवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी जपान सरकारने Government of Japan हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चीनला हजारो कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. याआधी अमेरिकेने चीनशी सर्व व्यापारी संबंध तोडले आहे तसेच अनेक चिनी कंपन्यांना अमेरिकेत बंदी घातली आहे. भारतानेही चीनच्या अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

आता जपान आपल्या 57 कंपन्या चीनमधून परत आणणार आहे. या 57 कंपन्यांना जपानमध्ये येऊन उत्पादन घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी जपान सरकारने 54 कोटी डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे. चीनमध्ये असलेल्या सर्व जपानी कंपन्यांना परत आणण्यासाठी जपान सरकार 70 अब्ज खर्च करणार आहे. व्यापाराबरोबरच चीनला परराष्ट्र धोरणात कोणतेही सहकार्य करायचे नाही, असा निर्णय जपानने घेतला आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post